सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाड जि.प.प्राथ.शाळा.व अंगणवाडी चौधरवाडी शाळेच्या मुलांनी नुकताच ग्रामपंचायत कार्यालय समोर आठवडे बाजार भरवला होता. ग्रामस्थांनी बाजारात खरेदी करून मुलांना प्रोत्साहन दिले. बाजारामध्ये मुलांनी विविध वस्तूंची दुकाने फाटली होती यामुळे मुलांच्या व्यवहारी ज्ञानात भर पडणार आहे ग्रामपंचायत सरपंच शशांक पवार, उपसरपंच राहुल चौधरी सदस्य यांच्या हस्ते उदघाटन झाले. मुलांना आर्थिक व्यवहार समजावेत, शिक्षण आणि व्यवहार यांची सांगड घालावी, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आठवडी बाजार भरवला होता. यामध्ये मुलांनी विविध खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळभाज्या, पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती. आठवडी बाजार खरेदीसाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सोमेश्वर कारखाना विद्यमान ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्य अध्यक्ष सुचिता साळवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ ,सदस्य गोरख चौधरी, तानाजी भापकर, निखिल चौधरी, पोलीस पाटील राजकुमार शिंदेेे, चारुहंस शिंदे, सुखदेव शिंदे,कैलास पवार, रमेश चौधरी, केंद्र प्रमुख शब्बीर शेख, खामकर सर,बालगुडे सर बालगुडे मॅडम, खामकर मॅडम पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.



