Type Here to Get Search Results !

करंजे-देऊळवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

करंजे-देऊळवाडी ग्रामपंचायत  व ग्रामस्थांच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.


सोमेश्वरनगर - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना बारामती तालुक्यातील करंजे ग्रामस्थ वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी २८/२०२६ रोजी सकाळी विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले.
त्या निधनाने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारच्या वतीने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.ग्रामपंचायत करंजे प्रांगणात अजितदादा पवार यांना समस्त करंजेकरांच्या वतीने वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
लाडके अजितदादा आपण शरीराने आमच्यात नसाल तरी सुद्धा आपली शिस्त,विचार, आपले कार्य आणि आठवणी कायम आमच्या सोबत राहतील ... असे म्हणत दादा.... दादा... दादा... असे म्हणत निशब्द झाले तर उपस्थितांचा कंठ दाटून येत डोळे पाणवले. घरातलीच एक सदस्य गेला आहे असे वातावरण होते तर प्रत्येक जण एकमेकाला सांत्वन करत आपण पुढे दादांच्या विचारांनी कार्य करत राहू हीच आपली दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल असे म्हणत निशब्द शोकसभा थांबली.
यावेळी करंजे देऊळवाडी ग्रामस्थ तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील लहान थोर व सर्व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test