सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील फकरुद्दीन समशेर मुलाणी यांचे निधन झाले ते ८१ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहीत मुले नात नातवंडे असा मोठा परिवार आहे. आरोग्य विभागात कार्यरत असलेले फिरोज मुलाणी, परवेझ मुलाणी तसेच समीर मुलाणी यांचे ते वडील होत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये विना अपघात सलग ३५ चालक म्हणून त्यांचा गौरव झाला होता.
करंजे (ता. बारामती ) स्मशानभूमी येथे आज मंगळावर दि ३रोजी दुपारी दीड वाजता दफनविधी होणार आहे.



