निरा बारामती रस्त्यावर सोरटेवाडी हद्दीत सहा फाटा नजीक झाडाची फांदी पडण्याच्या स्थितीत... दुर्घटना होण्याची शक्यता.
सोमेश्वरनगर-निरा बारामती रस्ता या रस्त्यावर मोठी वाहतूक असते सोमेश्वरनगर येथे मोठे शैक्षणिक संकुलन आहे सोमेश्वर साखर कारखाना असल्याने या रस्त्यावर ऊसतोड बैलगाडी ट्रक ट्रॅक्टर तसेच व्यावसायिक नोकरदार विद्यार्थी यांच्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते निरा बारामती रस्त्यालगत बारामती तील सोरटेवाडी हद्दीतील सहा फाटा नजीकच्या वडला लगत असणाऱ्या बाभळी या झाडाची फांदी रस्त्यावर पडण्याचे स्थितीत आहे ...त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे यामुळे संबंधित प्रशासनाने त्वरित ही फांदी त काढण्यात यावी असे स्थानिक नागरी व प्रवाशांनी मत व्यक्त केले.



