Type Here to Get Search Results !

"हर हर महादेव" च्या गजरात लाखो शिवभक्तांनी घेतले "सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग "दर्शन.....महाशिवरात्रीनिमित्त विविध जिल्ह्यातील शिवभक्त सोमेश्वर दर्शनासाठी दाखल ; दुपारनंतर भाविकांचा महापूर.सोमेश्वरनगर

"हर हर महादेव" च्या गजरात लाखो शिवभक्तांनी घेतले सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शन.

महाशिवरात्रीनिमित्त विविध जिल्ह्यातील शिवभक्त सोमेश्वर दर्शनासाठी दाखल ; दुपारनंतर भाविकांचा महापूर.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रति सोरटी सोमनाथाचे रूप मानले जाणारे श्रीक्षेत्र करंजे येथील श्री सोमेश्वर मंदिर आहे. येथे श्रावण महिना व महाशिवरात्र या दिवशी विविध जिल्ह्यातून शिवभक्तांची स्वयंभू शिवलिंग दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते . महाशिवरात्रीनिमित्त रविवारी दि. १५ रोजी पहाटेपासूनच शिवभक्तांनी रंगाच्या रंग लावलेल्या होत्या व मंदिर व मंदिर परिसर हर हर महादेव च्या गजराने गजबजून गेला होता.
रविवारी पहाटे बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर तसेच तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या हस्ते स्वयंभू शिवलिंगाची महापूजा करण्यात आली. या वेळी विश्वस्त समिती अध्यक्ष अनंता मोकाशी, सचिव विपूल भांडवलकर , सर्व विश्वस्त सह ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते.
महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ओंकार शिंदे, अविनाश सावंत, हिंमत सोरटे, हेमंत घाडगे, राजेंद्र
गाडेकर यांनी दिवसभर महाप्रसादाची आयोजन केले होते. अनेक भाविकांनी सोमेश्वर दर्शनानंतर सती मालुबाई मंदिरात दर्शन घेतले. होळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि साई सेवा हॉस्पिटल वाघळवाडी यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत औषधोपचार करण्यात आले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गेला आठवडाभर सुरू असलेल्या अतिरुद्र अनुष्ठानाची सांगता महाशिवरात्री दिनी झाली.
सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसर विविध खेळणी, मिठाई, प्रसाद, पानफुले, पाळणे, हॉटेल आदींच्या दुकानांमुळे सर्व परिसर गजबजून गेलेला होता विशेष रविवारी सुट्टी असल्याने चिमुकल्यांची गर्दी पाहावयास मिळाली
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test