करंजेपूल बस स्टॅन्ड येथे सिनेस्टाईलने हाणामारी... मग काय पोलिसांनी दाखवला खाक्या ...१३ जणांवर गुन्हा दाखल तर ८ जणांवरती अटकेची कारवाई.
जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - नागनाथ पाटील
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजेपूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व फिर्यादीचे नातेवाईक यांना आरोपी व आरोपीचे मित्र यांनी बेकायदेशीरित्या जमाव जमवून काचेची बॉटल, लाकडी दांडके, लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी एकूण 13 जणांवरती दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील एक इसम ऋषिकेश सुरेश शिंदे हा गंभीर जखमी असून सान्वी हॉस्पिटल करंजेपुल या ठिकाणी उपचार घेत आहे. यातील 08 आरोपी वरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
🔹गुन्हा रजिस्टर नंबर 30/2026 BNS कलम 118(2),118(1),115(2),189(2),191(2),191(3),190
1.या गुन्ह्यातील फिर्यादी नामे ऋषिकेश सुरेश शिंदे राहणार करंजे पूल तालुका बारामती जिल्हा पुणे (सध्या अंतररुग्ण असून उपचार घेत आहे)
2.आरोपीची नावे: १. सखाराम अहिरे २. गणेश अहिरे, ३. महेश अहिरे वरील तिन्ही राहणार नसरापूर तालुका वेल्हा जिल्हा पुणे.४. स्नेहल सुरेश जगताप राहणार निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे, ५. सागर बाळू साळुंखे, ६. संकेत सतीश सोनटक्के दोन्ही राहणार मानाजी नगर साक्षी संकुल फेज पुणे ७. साहिल भरत सावंत व ८. संदीप लक्ष्मण लगस राहणार सिंहगड रोड विठ्ठलवाडी हिंगणे, पुणे
🔹गुन्हा रजिस्टर नंबर 29/2026BNS कलम 118(1),115,189(2),191(2),90,351,352
1. फिर्यादीचे नाव स्नेहल सुरेश जगताप राहणार निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे
2. आरोपीची नावे १. संकेत सुरेश शिंदे, २. ऋषिकेश सुरेश शिंदे, ३ निकिता गणेश अहिरे, ४. रत्ना सुरेश शिंदे व,५. अश्विनी संकेत शिंदे सर्व राहणार करंजेपुल तालुका बारामती जिल्हा पुणे.
सदर गुन्ह्याचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत.
___________
कोणीही बेकायदेशीर जमाव जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची प्रयत्न केल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल.



