येणाऱ्या सोमवार दि. ०२ मार्च रोजी रोजी बाजार सुरू करण्याचे नियोजन.
सर्व व्यापारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा - सरपंच भाऊसो हुंबरे
सोमेश्वर/करंजे - बारामतीतील करंजे गाव या ठिकाणी आठवडे बाजार सुरू करण्यात येत आहे. जिल्हा परिषद गॅजेट नुसार सोमवारी बाजार भरवण्याकरिता परवानगी असून येणाऱ्या सोमवार दि. ०२ मार्च २०२६ रोजी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व व्यापारी वर्ग व आजुबाजुच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेवून ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी यांना सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती.
बाजाराची विशेष वैशिष्टये...
________________________
* पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सुविधा २४ तास पाणी उपलब्ध
* व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज बैठक व्यवस्था
* पार्किंगची उत्तम सोय
* चारही बाजूने बाजाराला जोडले जाणारे गावातील रस्ते
सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी व सर्व ग्रामस्थ, करंजे-देऊळवाडी, ता. बारामती, जि.पुणे



