Type Here to Get Search Results !

करंजे गावातील आजच सोमवार रोजी सुरू झालेल्या आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद....सोमेश्वर पंचक्रोशीतील आलेला शेतकरी व व्यापारी करंजे बाजार तळ नियोजन पाहता आनंदी..

करंजे गावातील आजच सोमवार रोजी सुरू झालेल्या आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद.
सोमेश्वर पंचक्रोशीतील आलेला शेतकरी व व्यापारी करंजे बाजार तळ नियोजन पाहता आनंदी..




बारामतीतील करंजे गाव या ठिकाणी आठवडे बाजार सुरू करण्यात येत आहे. जिल्हा परिषद गॅजेट नुसार सोमवारी बाजार भरवण्याकरिता परवानगी आज सोमवार दि. ०२ मार्च २०२६ रोजी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व व्यापारी वर्ग व आजुबाजुच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेवून ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी यांना सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती केली होती या विनंतीला मान देत सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकरी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने आज असणाऱ्या आठवडे बाजारानिमित्त दाखल झालेला आहे. यापुढेही आम्ही सोमवार निमित्त असलेला आठवडे बाजार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही आलेले पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापारी वर्ग यांनी बोलताना सांगितले

बाजाराची विशेष वैशिष्टये
* पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सुविधा २४ तास पाणी उपलब्ध
* व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज बैठक व्यवस्था
* पार्किंगची उत्तम सोय
* चारही बाजूने बाजाराला जोडले जाणारे गावातील रस्ते 

सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी व सर्व ग्रामस्थ, करंजे-देऊळवाडी, ता. बारामती, जि.पुणे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test