Type Here to Get Search Results !

सोमेश्वर सायन्स कॉलेज मध्ये "Use of Al in revolutionizing farming practices" विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

सोमेश्वर सायन्स कॉलेज मध्ये "Use of Al in revolutionizing farming practices" विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
सोमेश्वरनगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि सूक्ष्मजिवशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात होण्यासाठी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. सदर प्रकल्पाबाबत सखोल माहिती ही प्रकल्पाचे संशोधन समन्वयक व सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. योगेश फाटके यांनी विद्यार्थ्यांना दिली. सदर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी भविष्यात वरदान ठरणार असून याचा वापर सर्वसामान्य शेतकरी देखील कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी करू शकतील. भविष्यात हे तंत्रज्ञान उसाव्यतिरिक्त अन्य पिकासाठी वापरण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा मानस असून त्यासंबंधीचे संशोधन देखील पूर्ण झाले आहे असे डॉ. फाटके यांनी सांगितले.

कॉलेजचे प्राचार्य डॉ एस. बी सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या देखील शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यशाळेसाठी कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डि.व्ही. बनसोडे, कॉलेजच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. व्ही. डि. थोपटे, प्रा. डॉ. वाय बी. गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कार्यशाळेच्या समन्वयक व सूक्ष्मजिवशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापिका शुभांगी कांबळे यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. माधुरी भांडवलकर आणि आभार प्रा. जयश्री भोसले यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलींद कांबळे, संस्थेचे सचिव भारत खोमणे संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर व सर्व संचालक मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test