पालेभाज्या, फळे , हॉटेल, थंड पेय, कापड दुकाने,गृहपयोगी वस्तूंनी परिसर गजबजून गेला.
सोमवार आठवडे बाजार निमित्त आलेल्या सर्व नागरिक शेतकरी व व्यापारी यांना गुलाब पुष्प देतआभार .
सोमेश्वर करंजे - बारामतीतील करंजेगाव या ठिकाणी आठवडे बाजार पन्नास वर्षांनी सुरू होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले सोमवार निमित्त सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शन घेण्यासाठी सोमेश्वर पंचक्रोशीतून शिवभक्त भाविक येत असतात व करंजी येथील आठवडे बाजाराचा बाजार करत असतात असेही त्या बोलतानी सांगितले.
सरपंच भाऊसो हुंबरे ग्रामपंचायत सदस्य तसेच करंजे येथील आजी-माजी पदाधिकारी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद गॅजेट नुसार सोमवारी बाजार भरवण्याकरिता परवानगी आज सोमवार दि. ०२ मार्च २०२६ रोजी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले . यानिमित्त व्यापारी वर्ग आजुबाजुच्या परिसरातील तसेच मगरवाडी शेंडकरवाडी, कोंढाळकरवाडी,वाकी चोपडत ,पळशी तसेच चौधरवाडी भापकरमाळा ,देवळवाडी ,माळवाडी ,जोशीवाडी, रासकर मळा ग्रामस्थांनी याचा लाभ घेवून ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी यांना सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती केली होती या विनंतीला मान देत सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकरी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला उपस्थित राहिला व सर्वच गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आपला आठाळे बाजार घेतला व त्यांनी समाधानही व्यक्त केले
__________________________________________
आठवडे बाजारानिमित्त दाखल झालेला नागरिक व्यापारी यांना करंजे ग्रामस्थांच्या वतीने गुलाब पुष्प देत आभार व सन्मान ग्रामस्थांनी केला दर सोमवारी आठवडे बाजारासाठी येण्याचे नम्र आवाहनही केले
____________________________________________
शेतकरी व व्यापारी वर्ग यांनी भरलेल्या आठवडे बाजाराचे नियोजन म्हणून पार्किंग पाण्याची सोय बसण्याची व्यवस्था अतिशय छान केले असल्याने त्यांनी करंजे ग्रामस्थांचे आभार मानत कौतुक केले.



