Type Here to Get Search Results !

सुपे येथील ऐश्वर्य विठ्ठल मंदिरात बीजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.

सुपे येथील ऐश्वर्य विठ्ठल मंदिरात बीजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा उत्साहात साजरा करण्यात आला.


बारामती : बारामती तालुक्यातील सुपा मध्ये असलेले ऐश्वर्य विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि कुलवंत वाणी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री तुकाराम गाथा पारायण आणि बीजोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठ चालक ह.भ.प. माऊली महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गाथा पारायणाची सांगता झाली. गुरुवारी (दि. ५) सकाळी चव्हाण यांचे प्रवचन झाले. त्यानंतर दुपारी मंदिरात पुष्पवृष्टी करून बीजोत्सव करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test