वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची धडाकेबाज कारवाई.
तीन मोटार सायकल, घरफोडी उघड करत एकुन १लाख ६५ हजार ५०० रू.कि.चा मुददेमाल हस्तगत.
सोमेश्वरनगर - वडगाव निंबाळकर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची धडाकेबाज कारवाई घरफोडी व चोरीचे गुन्हयातील आरोपीस निष्पन्न करून तीन मोटार सायकलचे गुन्हे व एक घरफोडी उघड करून त्याचे कडुन एकुन १,६५,५०० रू.कि.चा मुददेमाल हस्तगत मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे कोऱ्हाळे बु।। ता. बारामती जि. पुणे गावचे हददीतील कटीण पुल येथुन फिर्यादीची लाल रंगाची मोटार सायकल नं. एम.एच ४२ ए.पी ९४९६ ही चोरीस गेलेबाबत फिर्यादीने वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५२/२०२६ बी.एन.एस कलम ३०३(२) प्रमाणे दाखल झाल्याचे अनुशंगाने प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनन हद्यीत पेट्रोलींग करीत असताना आम्हाला एक संशयीत इसम मोटार सायकल नंबर नसलेली हि संशयीतरित्या चालवित असताना मिळुन आला असता त्याचेकडे वरील मोटार सायकल बाबत अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचा मित्र मयुर भोसले रा. इंदापुर जि.पुणे याचे बरोबर मयुरचे दोन मित्र असे मिळुन त्यांनी १) कठीणपुल कोऱ्हाळे बु।। या ठिकाणावरून एक होंन्डा कंपणीची युनिकॉनर मोटर सायकल चोरून आणल्याचे सागितले तसेच २) फलटण ग्रामीण होळ गावातुन एक होंन्डा कंपणीची युनिकॉनर मोटर सायकल चोरून आणल्याचे सागितले ३) लोणंद येथुन हिरो कंपणीची स्पिलेन्डर मोटर साकयल चोरून आणलेचे सागितले आहे. त्या तिन्ही मोटर सायकल हया को-हाळे खुर्द होळ रोड लगत पुलाच्या जवळ काटवानामध्ये लपवुन ठेवल्या आहेत. तसेच वडगाव गावातील होळ या ठिकाणी त्याचा मित्र मयुर नितीन भोसले राहणार कालठण नंबर १ ता. इंदापुर जि. पुणे. व मयुर याचे दोन अनोळखी मित्र असे यांने बंद घरफोडल्याचे सागितले आहे. त्या बाबत खालील प्रमाणे संबधित पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
विधीसंघर्षीत बालक याने व त्याचे साथीदार १) मयुर नितीन भोसले राहणार कालठण नंबर १ इंदापुर जि.पुणे. व दोन अनोळखी इसम यांनी खालील ४ गुन्हे केले आहेत. त्याचेकडुन इतर चोरीचे व घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे त्याचा तपास चालु आहे.
१) वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५२/२०२६ भा.न्या.सं. कायदा २०२३ चे कलम ३०३ (२)
२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०/२०२६ भा.न्या.सं. कायदा २०२३ चे कलम ३४१ (४), ३०५ (अ).
३) फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन (सातारा) गु.र.नं. १३४/२०२६ भा.न्या.सं. कायदा २०२३ चे कलम ३०३ (२).
* ४) लोणंद पोलीस स्टेशन (सातारा) गु.र.नं. १३२/२०२६ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३ (२)
*
* तरी वरील ०४ गुन्हयात मिळुन चोरीस व घरफोडीत गेलेला असा एकुन १,६५,५००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा.श्री. संदीप सिंह गिल सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. प्रमोद क्षीरसागर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ पाटील, स्था. गुन्हे शाखा सपोनि श्री कुलदीप संकपाळ, सहा. फौ. बाळासाहेब कारंडे पो हवा अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पोपट नाळे, भाउसाो मारकड, सागर चौधरी, महेश पन्हाळे, आबा जाधव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले, नरेद्र यादव यांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास चालु आहे.



