Type Here to Get Search Results !

हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला : मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टर मशीनला पसंतीहार्वेस्टरमुळे एक एकराचे काम अर्ध्या तासात.

हार्वेस्टरने गहू काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला : मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टर मशीनला पसंती
हार्वेस्टरमुळे एक एकराचे काम अर्ध्या तासात.

सोमेश्वरनगर - बारामतीच्या पश्चिम भागात शेतकऱ्यांची गहू मळणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. परिसरात गव्हाची कापणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर हार्वेस्टर दाखल झाली आहेत. पारंपरिक शेती करणारा शेतकरी आता गव्हाची लवकर मळणी करण्यासाठी हार्वेस्टर मशीनचा वापर करताना दिसून येत आहे पारंपरिक शेतीत गहू काढण्याकरिता लागणारा वेळ पाहता. या हार्वेस्टर मशीनने ते केवळ तासाभरात होऊ लागल्याने यांत्रिकीकरणास शेतकरी पसंती देऊ लागला आहे. हार्वेस्टरमुळे शेतकरीही आता मजूर लावून वेळ वाया न घालवता कमीतकमी वेळात पिकांची मळणी करीत आहे. या मशीनमुळे आता गव्हाची मळणी झटपट व सोपी झाली आहे.

हवामान खात्याने थोडे दिवसातच पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिके मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. काही ठिकाणी लवकर पेरणी केलेल्या ज्वारी, गहू या पिकाची काढणी सुरू आहे. सुरुवातीपासूनच पोषक वातावरण असल्याने पिके टुमदार आली आहेत उताराही समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
___________________________________________
क्षेत्र कमी झाल्याने अनेकांनी बैलजोडी विकल्या परिणामी वेळेवर पेरणी करायला ट्रॅक्टर बोलवावे लागते. यांत्रिकीकरण वाढल्याने आता पारंपरिक सोंगणी, मळणी फारशी होत नाही. हार्वेस्टरनेच गहू काढण्याकडे सर्वांची पसंती आहे.
शेतकरी - दिलीप गोलांडे, सोमेश्वरनगर
___________________________________________
एक एकराचे काम अर्ध्या तासात
मजुरांचा वाढता तुटवडा, तसेच वाढलेली मजुरी पाहता शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीनने गहू काढणे अधिक सोयीचे वाटते. पारंपरिक पध्दतीने गहू काढावयाचा म्हटला तर एका एकराला दहा ते बारा महिला मजूर पाच हजारांपेक्षा जास्तीची मजुरी लागते. त्यात हा गहू मळणीकरिता लागणारे मजुरांची मजुरी वेगळीच असते. परंतु गहू काढण्याच्या या हार्वेस्टर मशीनमुळे एकरी तीन हजार रुपये दर देऊन एक एकर क्षेत्रातील गहू अवघ्या अर्धा तासात काढून होतो. शेतकऱ्याला या यंत्राच्या मदतीने केलेले कामामुळे कमी वेळात काम होत असल्याने यास मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे.
हार्वेस्टर मालक शिवाजी कोरडे, सोमेश्वरनगर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test