उत्तम (अण्णा) धिवार यांचा प्रथम पुण्यदिन साजरा
सासवड (प्रतिनिधी) बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांचे मोठे बंधू आणि खानवडी गावचे रहिवासी कालकथित उत्तम (अण्णा) धिवार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन महात्मा फुले सभागृह खानवडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा
जोतिराव फुले व राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला धिवार कुटुंबियांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालकथित उत्तम अण्णा
धिवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी पार पाडण्यात आला. यावेळी बौद्धाचार्य दादा गायकवाड, भारतीय बौद्ध महासभेचे महादेव कांबळे व सुरेश रणपिसे यांनी सुत्तपठनाचा कार्यक्रम पार पाडला. त्रिशरण पंचशील, पुण्यानुमोदन गाथा यांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते विष्णू दादा भोसले होते. अभिवादन सभेत विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी अनेक मान्यवरांनी कालकथित उत्तम अण्णा धिवार यांचा जीवनपट उलगडला. उत्तम अण्णा यांच्या स्मृती जागवत असताना त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. यामध्ये प्रामुख्याने उत्तम अण्णांचे कुटुंब विषय असणारे प्रेम, माया आणि जिव्हाळा याविषयी माहिती दिली. उत्तम अण्णा म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. पोलीस खात्यात नोकरी अत्यंत प्रामाणिकपणे केली. कोणताही भ्रष्टाचार त्यांनी केला नाही. आई वडील, भावंडे, बहिणी आणि पत्नी यांच्या विषयी प्रचंड प्रेम असणार हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही याची खंत कुटुंबपूरती मर्यादित न राहता संपूर्ण गावालाच लागलेली आहे. अध्यक्षीय भाषणामध्ये विष्णू दादा भोसले म्हणाले की, आज बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून सुनिल तात्या धिवार जे समाज कार्य करत आहे त्याचे श्रेय आई-वडिलांबरोबरच उत्तम अण्णांना जाते. सुनिल तात्या यांच्या जडणघडणीमध्ये उत्तम अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. उत्तम अण्णांनी एक आदर्श कुटुंब निर्माण केले. त्यामध्ये त्यांचा मोठा मुलगा ज्ञानदीप वेल्हा पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहे,दुसरा मुलगा दीपक धिवार पुणे येथे अग्निशमन दलात कार्यरत आहे, मुलगी दिपाली गंगावणे आरोग्य सेवेमध्ये आरोग्य सेविका म्हणून काम करत आहे तर दुसरी मुलगी रूपाली मोरे या माळेगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार म्हणून काम पाहत आहेत. अशाप्रकारे एक आदर्श कुटुंब त्यांनी घडविले. बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांनी मोठे बंधू कालकथित उत्तम अण्णा यांच्या विषयी आठवणी सांगताना मनोगत व्यक्त केले की अण्णांनी घर एकत्र रहावे, कुटुंब एकत्र रहावे म्हणून पंधरा वर्षे खानवडी ते पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय असा प्रवास करून नोकरी केली. सकाळी सात वाजता सायकल वरून ते सासवडला जात असत. सासवडला सुनील मुळीक यांचे सायकल दुकान श्रीराम सायकल मार्ट येथे सायकल लावून सासवड एसटी स्टँड वरून एसटीने पुणे स्टेशनला जात असे. पुणे स्टेशन वरून ते पाषाण मार्ग जाणारी बस पकडून पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय चव्हाण नगर येथे जात असत. संध्याकाळी सहा वाजता कामाची सुट्टी झाल्यानंतर परतीचा प्रवास चालू व्हायचा. घरी यायला त्यांना रात्रीच्या नऊ वाजायच्या. पुन्हा सकाळी साडेपाचला उठून कामासाठी तीच धावपळ. तीच वसवस. फक्त माझं कुटुंब एकत्र राहावे. त्यांनी पंधरा वर्षे हा प्रवास केला.त्यांनी ठरवले असते तर ते पत्नीला घेऊन पुण्यामध्ये राहू शकले असते परंतु त्यांनी तसे न करता आई-वडिलांसोबत आणि भावंडांसोबत पत्नीला घेऊन पंधरा वर्ष त्रास सहन करून कुटुंबाला प्रेम दिले. बदली जेव्हा बारामतीला झाली तेव्हाच ते कुटुंबासह बारामतीला राहिला गेले. तरी सुद्धा एकही शनिवार रविवार असा चुकला नाही की ते आई बापू आणि मला भेटायला खानवडीला आले नाहीत असे झालेच नाही. कसं राहायचं, असं वागायचं हे मला अण्णांनी शिकवले. मी अण्णांचा खूप लाडका होतो. असा हा आज माझा मोठा भाऊ माझ्याबरोबर नाही याचे माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना खूप मोठी उणीव भासत आहे. अण्णा तुम्ही जरी आज आमच्यात नसले तरी तुम्ही दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर आम्ही निश्चितच सर्वजण वाटचाल करू असा आज तुमच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त तुम्हाला शब्द देतो.
प्रथम पुण्यस्मरण दिन कार्यक्रमांमध्ये पुरंदर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जी जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अजय इंगळे,सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वामन तात्या जगताप, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य रमेश आबा इंगळे, सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या सचिव नंदकुमार सागर, राष्ट्रपती पारितोषिक विजेते माजी मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, रावसाहेब पटवर्धन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य अनिल कांबळे, पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य इस्माईल सय्यद, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे बीएमसी चे प्राचार्य वसंत धिवार,सेवा निवृत्त फॉरेस्ट अधिकारी शिवाजीराव फुले, गुरुकुल अकॅडमीचे संस्थापक संदीप टिळेकर, सासवड नगरपालिकेचे नगरसेवक,सोपान रणपिसे , नगरसेवक प्रमोद टकले, ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड.विजय भालेराव, उद्योजक प्रकाश काटे,उद्योजक आनंद कांबळे, टेल्को युनियनचे नेते सुधाकर कडलाख,हवेली माजी सदस्य पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, उद्योजक दीपक कुंजीर, सेवानिवृत्त अभियंता बाळासाहेब कांबळे, सर्कल भाऊसाहेब संजय बडदे, तलाठी भाऊसाहेब सुरेश जगताप,मांजरी गावचे पोलिस पाटील भोसले वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय भालेराव, बहुजन चळवळीतील मुलुख मैदानी तोफ श्रीकांतदादा होवाळ, परिवर्तन क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल दादा लोंढे,वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते संदीप बेडकर,कृषी उत्पन्न बाजार समिती नीरा मार्केट कमिटीचे सदस्य गणेश होले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी विजय कांबळे,बहुजन हक्क परिषदेचे उपाध्यक्ष शशीभाऊ गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होले,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश पवार, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ढावरे,बौद्धाचार्य बाळासाहेब पोळ,जितेंद्र पोळ,
बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव कैलास धिवार, बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष नाना साहेब मदने, सामाजिक कार्यकर्ते महादेवजी भोंडे,पुणे जिल्हाध्यक्ष केशव दादा भोसले, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संतोष डुबल, पळशी गावचे सरपंच माणिक आबा काळे, उद्योजक विकास जाधव, आरपीआयचे बारामती तालुकाध्यक्ष विश्वास भोसले, पुरंदर तालुका आरपीआय चे अध्यक्ष बळीराम सोनवणे,बी.जे.पी चे युवा नेते अमोल जगताप, दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार योगेशजी भोसले,यश एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रकाश जगदाळे, झी टीव्ही फेम जादूगार शिवम माने ,होम मिनिस्टर फेम आकाश वाघमारे, उद्योजक सुभाष अण्णा सूर्यवंशी, मांजरी गावचे पोलीस पाटील अमोल,भोसले,शिक्षक योगेश घोरपडे,बहुजन हक्क परिषदेचे संघटक सचिन गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते कांता भोंडे, पत्रकार कृष्णा फुलावरे,एखतपूर मुंजवडीचे उपसरपंच तुषार झुरुंगे, वाळुंज गावचे माजी उपसरपंच गोविंद इंगळे,अनिल इंगळे, उद्योजक महेंद्र इंगळे ,अतुल जगताप, संभाजी राजे जगताप, कृषी अधिकारी सुनिल जगताप,श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष सुधीर साळवे, माजी मुख्याध्यापक रामकृष्ण वाघमारे,बौद्धाचार्य बाळासाहेब पोळ ,जितेंद्र पोळ,उद्योजक रोहिदास होले,खानवडी गावचे उपसरपंच ॲड. स्वप्निल होले, माजी सरपंच चंद्रकांत फुले, माजी आदर्श सरपंच,रवींद्र फुले,नितीन होले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश रासकर, खानवडी गावचे पोलीस पाटील सचिन होले, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय होले ,माजी सरपंच भाऊसाहेब खोमणे, माजी सरपंच नितीन होले,बहुजन हक्क परिषद चे संघटक शरद नेटके,रामभाऊ नेवसे, मल्हारी होले, उद्योजक गणेश होले, उद्योजक राजेंद्र फुले, प्रमोद डेंगळे,पत्रकार अक्षय कोलते,माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब होले,ज्येष्ठ नागरिक तात्या नेवसे, ज्ञानदेव होले, लक्ष्मण होले, मोहन फुले, बहुजन हक्क परिषदेचे संघटक गणेश गरदडे,प्रा.बालाजी नाटकर, पुरंदर तालुका संघटक भिकाजी धिवार,बहुजन हक्क परिषदेचे खळद शाखा अध्यक्ष सोमनाथ कांबळे, गुळूंचे शाखेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, देगावचे माजी सरपंच अण्णा शेलार, यासह अनेक आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार, विविध गावचे सरपंच ,उपसरपंच पदाधिकारी, विविध संघटनांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते, पदाधिकारी ,नेते ,कार्यकर्ते व
धिवार कुटुंबावर प्रेम करणारा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
यावेळी धिवार कुटुंबियांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांच्यावतीने उत्तमअण्णांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांचे आभार ज्ञानदीप धिवार यांनी मानले.



