बारामती - ज्युबीलंट कामगार युनियनच्या कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच युनियनच्या कार्यालयात पार पडली. संघटनेच्या वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर, घटनेतील तरतुदीनुसार प्रियराज उर्फ अभिजीत सतीशराव काकडे यांना मानसेवी/स्वीकृत सभासद म्हणून समाविष्ट करून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या संदर्भातील पत्र जुबिलन्ट व्यवस्थापनास देण्यात आले असून कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त तसेच निबंधक, शक्ती चेंबर, संगमवाडी, पुणे येथेही सादर करण्यात आले आहे.
कामगारांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून अभिजीत काकडे यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय सोनवणे यांनी व्यक्त केला. तसेच अध्यक्ष सतीशराव काकडे यांचे संघटनेला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले. संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅड. गौरव पोळ आणि शिवाजीराव खटकाळे यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.
निवड झालेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष – सतीशराव शिवाजीराव काकडे
उपाध्यक्ष – अभिजीत सतीशराव काकडे
उपाध्यक्ष – सुरेश आनंदराव कोरडे
जनरल सेक्रेटरी – संजय पांडुरंग सोनवणे
सेक्रेटरी – सतीश बाबुराव काकडे
सेक्रेटरी – जयदीप शामराव काकडे
खजिनदार – उत्तम दिनकर गलांडे
सदस्य – संभाजी बबनराव निगडे, सतीश मारुती काकडे, चंद्रशेखर उत्तमराव दगडे
संघटनेच्या या नव्या कार्यकारिणीकडून कामगारांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



