महिला दिनी पोलिस महिलांना पुष्पगुच्छ देत सन्मानित
बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे येथे रविवार ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सर्व महिला पोलिस अंमलदार यांनी पोलीस ठाणे चा कार्यभार सांभाळला...
यामध्ये ठाणे अंमलदार महिला पोलीस हवालदार शेख, CCTNS महिला अंमलदार गायकवाड, जाधव, वायरलेस महिला पोलीस अंमलदार शिंदे, dail 112 करीता महिला पोलीस अंमलदार केंद्रे आणि सूळ, पासपोर्ट महिला पोलीस अंमलदार बनसोडे, मदतनीस महिला पोलीस अंमलदार बनगर आणि वाहन चालक महिला पोलीस अंमलदार प्रेरणा सावंत असे सर्वांनी मिळून पोलीस स्टेशन चे कामकाज पहिले.
कामकाजदरम्यान सपोनी सचिन लोखंडे यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.



