Type Here to Get Search Results !

एकमेकांना मनसोक्त रंग लावत रंगपंचमी साजरी.

एकमेकांना मनसोक्त रंग लावत रंगपंचमी साजरी.
सोमेश्वरनगर - होळी झाली की सर्वांना वेध लागतात ते रंगपंचमी सणाचे रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण होळीनंतर पाच दिवसांनी साजरा करण्यात येतो तो रंगपंचमीचा सण लहान थोर एकत्ररंगाचा हा सण रविवार ८ मार्च रोजी साजरा करण्यात आला.
    रविवार सुट्टी अन् रंगपंचमी असल्याने बारामतीच्या पश्चिम भागात मुला मुलांनी सकाळ पासूनच रंगपंचमीला सुरुवात केली होती दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढली असल्याने थंडगार पाणी एकमेकाच्या अंगावर फेकत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा सण आवडतो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करण्याचा हा सण आहे. मनातील हेवे-दावे बाजूला ठेवून मन मोकळेपणाने रंगपंचमी साजरी केली जाते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test