Type Here to Get Search Results !

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेचे बारामती भाजपाच्या वतीने स्वागत - दिलीप खैरे

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेचे बारामती भाजपाच्या वतीने स्वागत - दिलीप खैरे

बारामती - काल केंद्रीय निवडणूक आयोगाने देश भरातील विधानसभांच्या निवडणूक तारखा जाहीर केल्या असून त्याच वेळी महाराष्ट्रातील बारामती व राहुरी येथील विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोट निवडणुका सर्वांसोबत समन्वय करून बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतली असून त्या भूमिकेचे बारामती तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येत असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब राज्याचे नेते व उच्च शिक्षण संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सरचिटणीस राजेश पांडे यांचे मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वा सोबत समन्वय साधून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

बारामती तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख हे सामाजिक दृष्ट्या आवश्यक तेथे सकारात्मक भूमिका घेणारे असल्याने व अजितदादा पवार यांच्या सारखं नेतृत्व अकस्मात जाण्याने झालेले दुःख पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच सर्वपक्षीय बारामतीकर भूमिका घेतील आणि हीच अजितदादा पवार यांना श्रद्धांजली असेल त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असून त्यासाठी बारामती तालुक्यातील सर्व राजकीय पक्षीय नेत्यांना व विविध संघटना यांना भेटून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती करणार आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test