Type Here to Get Search Results !

विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार...

विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार...
सोमेश्वरनगर - विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सी.बी.एस.ई वाघळवाडी (ताबारामती ) येथील इयत्ता आठवी मध्ये शिकणारे विद्यार्थी चि. सोहम संतोष कदम व चि. करण नरेंद्र डूडू यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट व गाईड्स यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या या परीक्षा दि १२ ते १५ फेब्रुवारी रामबाग, भोर या ठिकाणी घेण्यात आल्या. स्काऊट म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध कौशल्यांवर आधारित चाचणी परीक्षा घेतली जाते. यामध्ये प्रात्यक्षिक, लेखी तसेच तोंडी परीक्षांचा समावेश असतो. मुलांना टप्प्याटप्प्याने या परीक्षा उत्तीर्ण करून मग राज्य पुरस्कारासाठी पात्र ठरले जाते.

या विद्यार्थ्यांना शाळेतील स्काऊटर प्रज्ञा पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक सर यांनी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भविष्यात अनेक विद्यार्थी अशा परीक्षांना उपस्थित राहून स्काऊट चळवळीचा भाग बनतील अशी आशा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test