वडगाव निंबाळकर पोलिसांनी नागरिकांचे लाखो रुपये किंमतीचे हरविलेले एकूण १३ मोबाईलचा शोध घेऊन केले मूळ मालकांना परत.
सोमेश्वरनगर - पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे हरविलेले मोबाईल संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने मा. श्री. संदीप सिंह गिल्ल (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व त्यांचे मार्गदर्शनाखाली हरवलेली मोबाईल शोध घेऊन नागरिकांना परत करण्याबाबत पोलीस हवालदार अनिल खेडकर व इतर स्टाफ याचे पथक नेमून तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन ते नागरिकांना परत करणे संदर्भात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत पथक नेमण्यात आले होते.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मोबाईल शोध पथक यांनी खालील प्रमाणे मोबाईल जप्त केले आहेत.
उदय तानाजी दरेकर, रा. वडगांव निंबाळकर, प्रदीप ज्ञानदेव पवार, रा. निंबुत , इंद्रसेन दीपक शिंदे, रा. वडगांव निंबाळकर , नितीन अनिल देशमुख, रा. माळवाडी लाटे, प्रशांत संभाजी भंडलकर, रा. करंजे, अशोक महादेव ठोंबरे, रा. साखरवाडी ता. फलटण, प्रांजली ज्ञानेश्वर शिंदे, रा. मुरूम , रणजित सुभाष पवार, रा. वडगांव निंबाळकर , विजय यशवंत भापकर, रा. चौधरवाडी, दत्तात्रय संताजी गाडेकर, रा. वाकी , संगिता रंगनाथ मारने, रा. सस्टेवाडी , सोमनाथ दत्तात्रय खांडेकर, रा. सस्तेवाडी) श्रीधर राजेंद्र जगताप असे एकूण ४ लाख ५ हजार रुपये किंमतीचे एकूण १३ मोबाईलचा शोध घेऊन वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणाहून घेऊन रोजी वरील प्रमाणे नमूद मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही संदीप सिंह गिल्ल सो. (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग,. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. प्रमोद क्षीरसागर, पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस हवालदार अनिल खेडकर, पोपट नाळे, हदसनाथ देवकर, विलास ओमासे वडगांव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.



