Type Here to Get Search Results !

मु.सा काकडे महाविद्यालयातील सय्यद आलीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मु.सा काकडे महाविद्यालयातील सय्यद आलीची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
सोमेश्वरनगर. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय जूनियर कुस्ती स्पर्धेमध्ये मु.सा काकडे महाविद्यालयाचा खेळाडू आली रियाज सय्यद (१२ वी विज्ञान,१९वर्ष वयोगट, १२०किलो वजनगट) याने दमदार कामगिरी करत महाराष्ट्रातून ओपन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.त्याची १२ एप्रिल रोजी छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
  अलीने  स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, चपळता आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर (१०.००)मात करत विजेतेपद मिळवले. पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे देशमुख व संस्थेचे विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांनी अलीचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.  
 तो राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे नाव उज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला. पैलवान अलीला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. बाळासाहेब  मरगजे,प्रा. दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test