राजीवभाऊ सोरटे डेअरी फार्म वतीने वाकी येथे दूध संकलन केंद्राचे उदघाटन.
दूध उत्पादकांचा विकास हाच आमचा ध्यास
सोमेश्वर पंचक्रोशी गेली तीन वर्षापासून आम्ही सोरटेवाडी (ता.बारामती) येथे दूध संकलित करत असून आपल्या सेवेत आम्ही बारामती तालुक्यातील वाकी या ठिकाणी नव्याने
"ना नफा... ना तोटा" या तत्त्वावर दूध संकलन केंद्र चालू केले आहे .. या केंद्राचे उदघाटन वाकी गावचे सरपंच बोडरे व सदस्य व उपसरपंच इंद्रजीत जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी अंकुश सोरटे, दादा सोरटे ,दीपक पवार, शेखर जगताप ,नितीन चिकणे ,महेंद्र शेंडकर ,अक्षय सोरटे, करीम मुलानी, सुभाष दुर्वे ,संतोष पवार आणि परिसरातील गवळी व दूध उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते .
तीन पाच ...आठ पाच क्वालिटी नुसार आपण 39 रुपये 50 पैसे असा उच्चांकी दुधदर देणार असल्यााचे राजीव सोरटे यांंांंनी सांगितले
'दूध उत्पादकांचा विकास हाच आमचा ध्यास' या वाक्याप्रमाणे आम्ही वाटचाल करत आहोत तरी पंचक्रोशीतील शेतकरी दूध उत्पादक यांनी सहकार्य करावे असे नम्र आवाहन केले.



