बारामती : विद्या प्रतिष्ठान संचलित विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल. (CBSE) चा इयत्ता दहावी (AISSE 2025-26) चा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. एकूण 66 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या निकालात 8 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे, तर 9 विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्के, 25 विद्यार्थ्यांनी 80 ते 89 टक्के आणि 20 विद्यार्थ्यांनी 70 ते 79 टक्के गुण मिळवले आहेत. 4 विद्यार्थ्यांनी 60 ते 69 टक्के गुण मिळवले आहेत.
या परीक्षेत
आदिश्री गणेश हिरवे हिने 98.00 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वराज महेश काकडे (97.60 टक्के) याने द्वितीय, तर वेदिका अंकुश तावरे (96.40 टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला.
विषयानुसार इंग्रजी, मराठी व आयटी विषयात अनेक विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. हिंदी विषयात स्वराज काकडे (98), विज्ञान विषयात स्वराज काकडे (99), तर समाजशास्त्र विषयात स्वराज काकडे व आदिश्री हिरावे यांनी प्रत्येकी 96 गुण मिळवले आहेत.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सचिन पाठक सर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



