Type Here to Get Search Results !

वाघळवाडी स्मशानभूमी येथे स्व.वसंतराव सकुंडे (सर) यांच्या स्मरणार्थ विविध फुलांची रोपांचे वृक्षारोपण.

वाघळवाडी स्मशानभूमी येथे स्व.वसंतराव सकुंडे (सर) यांच्या स्मरणार्थ विविध फुलांची रोपांचे वृक्षारोपण.
सोमेश्वरनगर - गाव तर आपण स्वच्छ करतो पण, त्या बरोबर गावची स्मशानभूमी देखील स्वच्छ, सुंदर आणि सावली देणारी रहावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्नशील राहून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असा संदेश बारामती तालुक्यातील वाघळवाडी स्मशानभूमी येथे  स्व. वसंतराव सकुंडे (सर)  यांच्या स्मरणार्थ मुलगा अँड. अनंत सकुंडे यांनी  दिला आहे.  स्व.वसंतराव सकुंडे (सर) यांचा स्मृतिदिन २२ जून असून सध्या पावसाचे वातावरण असल्याने फुलझाडे ही बहरण्यास मदत होणार असल्याकारणाने त्यांनी  बहावा,कांचन, पांगारा,गोकर्ण, पळस, सोनचाफा ,पिंपळ, ताम्हण अशी  एकूण ८० फुलझाडे तसेच सावली देणाऱ्या देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमामुळे स्मशानभूमी परिसरात शांत स्वच्छ आणि हरित वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

यावेळी  अँड.अनंत सकुंडे सह सरपंच हेमंत गायकवाड, दिगंबर सावंत, बापूकाका सावंत, नितीन सुतार, केदार सकुंडे, अजित सावंत, गणेश सावंत, अजित (पप्पू) जाधव, अजित शिंदे व विराज साळुंखे यांनी श्रमदान करून वृक्षारोपणात सहभाग घेतला.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test