Type Here to Get Search Results !

भरधाव वाहनांना ब्रेक लावण्यासाठी गतिरोधक बसवण्याची गरज.

भरधाव वाहनांना ब्रेक लावण्यासाठी गतिरोधक बसवण्याची गरज.
सोमेश्वरनगर - सोमेश्वर मंदिर रोड करंजे, गायकवाड वस्ती ते करंजेपूल (ता बारामती) या मार्गावर एक स्पीड बेकर वगळता इतर मुख्य ठिकाणी स्पीड बेकर बसवण्याची गरज आहे , करंजेपूल हे मोठे शैक्षणिक संकुलन आहे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच  हॉस्पिटल व विविध व्यवसाय असल्याने सोमेश्वर मंदिर ते करंजेपूल विद्यार्थ्यांनागरिकांचे वाढती वाहतूक मोठी वर्दळ लक्षात घेता अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. सोमेश्वर भाग शाळा करंजे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी गतिरोधक आहे .परंतु  पुढील अंतरावर धोकेदाय वळण असून तीन किलोमीटर टप्प्यात एकही गतिरोधक नाही त्यामुळे दुचाकी चार चाकी तसेच  तसेच मोठी वाहने सुसाट ये जा करत असतात यामुळे येथे छोटे मोठे अपघातही झाले आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी करंजेतील मुख्य चौक तसेच पुढे आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे संबंधित प्रशासनाने पाहणी करत य करत गतिरोधक करावे असे स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले नुकतीच मुर्टि  येथे गतिरोधक नसल्याच्या कारणाने एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  या मार्गावरून धावणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आणि संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत गतिरोधक बसवणे गरजेचे आहे यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनीही बोलताना व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test