Type Here to Get Search Results !

नीरा डावा कालवा मध्ये युवकाचा तरंगलेला मृतदेह आला आढळून.

नीरा डावा कालवा मध्ये युवकाचा तरंगलेला मृतदेह आला आढळून.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपूल दूरक्षेत्र हद्दीत दिनांक ३१ मे रोजी वाघळवाडी ( ता. बारामती) लोखंडी पुलाजवळ निरा डावा कालवा नीरा डावा कालवा मध्ये युवकाचा तरंगलेला मृतदेह आढळून आला 
मिळालेल्या माहितीनुसार 
दिनांक ३१ मे रोजी वाघळवाडी( ता. बारामती जि. ) हददीत लोखंडी पुलाजवळ निरा डावा कालवा (कॅनॉल) मध्ये पोहण्यासाठी गेलो असता, तेथे असणारे लोकांकडून व मुलांकडून समजले की, एक मयत बॉडी कॅनॉलमधून मळशी बाजूकडून पाण्याच्या प्रवाहातून वाहत लोखंडी पुलाकडे येत आहे. त्यावेळी मी करंजेपूल दूरक्षेत्र येथिल पोलीसांना घडलेल्या घटनेची माहीती फोनद्वारे दिली. थोड्याच वेळात लोखंडी पुलाजवळ करंजेपूल दूरक्षेत्र येथिल पोलीस आल, सदरची बातमी ऐकून इतरही लोक जमा झाले होते. साधारणत दुपारी ०३.३० वा चे सुमारास एक पुरूष जातीची मयत बॉडी उताणे स्थितीत कॅनॉलचे पाण्यातून वाहत येताना दिसली. सदर मयत बॉडी स्थानिक पोलीसांनी वे लोकांचे मदतीने कॅनॉलचे बाहेर काढली. सदरची मयत बॉडी पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे -६ असल्याचे दिसून आल, तसेच त्याचें अंगात निळसर रंगाचा हाप बाहयाचा टी शर्ट व काळे रंगाची ट्रक पॅन्ट तसेच सदर मयताचे डोकीस टक्कल पडलेले तसेच मयताचे डोकीस डोळयाजवळचा व दोन्ही भुवयाजवळचा भाग पाण्यातील जलचर प्राण्यांनी खाउन तसेच त्याचे नाकाच्या नाकपुडया व ओठ देखिल पाण्यातील जलचर प्राण्यांनी खाल्लेला दिसला. तेथ जमलेल्या कोणाच्याही ओळखीचा सदरचा मयत इसत नाही. तसेच त्याचे हाता - पायाचे तळवे पांढरे पडलेले दिसले.
तरी दिनांक ३१/०५/२०२६ रोजी दुपारी ०३.३० वाचे सुमारास मौजे वाघळवाडी ता बारामती जि पुणे गावचे हददीत लोखंडी पुलाजवळ एक पुरूष जातीची मयत बॉडी उताणे रूिथतीत कॅनॉलचे पाण्यातून वाहत येताना दिसली. सदर मयत बॉडी स्थानिक पोलीसांनी लोकांचे मदतीने कॅनॉलचे बाहेर काढली. सदरची मयत बॉडी पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचे दिसून आले. पुढील तपास करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस अधिकारी करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test