नाथ महाराजांच्या रचनांवरील 'सीडी'चे प्रकाशन
(मुख्य संपादक विनोद गोलांडे)
पुणे - अठराव्या शतकात क्षेत्र त्रिपुटी (जि. सातारा) येथे संजीवन समाधी घेतलेले (सन १७६६) योगी सत्पुरुष गोपालनाथ महाराज यांच्या त्रिशतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मोत्सवानिमित्त गोपालनाथ महाराजांच्या 'वेदान्त शिरोमणी' ग्रंथामधील ओव्यांवर आधारित 'शिरोमणी सार' हा ग्रंथ; तसेच नाथ महाराजांच्या रचनांवरील 'सीडी'चे प्रकाशन होईल. सोमवारी (८ जून) बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल.
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी, जितेंद्रनाथ, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती त्रिपुटी देवस्थानचे मठाधिपती गुरुनाथ महाराज व गोपालनाथ वंशज श्री ऋषिकेश महाराज घोलप व सुरेश साखवळकर यांनी दिली.



