Type Here to Get Search Results !

सुपा पोलिसांची तत्पर कारवाई; अपहरण झालेल्या युवकाची सुखरूप सुटका, दोन आरोपी अटकेत

सुपा पोलिसांची तत्पर कारवाई; अपहरण झालेल्या युवकाची सुखरूप सुटका, दोन आरोपी अटकेत
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीतून रविवार दि ७ रोजी ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. दंडवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याचे अपहरण झाल्याची माहिती प्राप्त झाली. सदर घटनेत लाल रंगाची स्विफ्ट कार क्र. MH-42-BJ-4445 मधून ओंकार प्रकाश भोसले व तन्मय सुधीर साळुंखे यांनी ऋषिकेश चांदगुडे यास जबरदस्तीने घेऊन सासवडच्या दिशेने नेल्याची माहिती मिळाली.
सदर माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार विशाल गजरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, पोलीस हवालदार संदीप लोंढे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई सागर वाघमोडे, पोलीस शिपाई संतोष जावीर, पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी, महिला पोलीस हवालदार दिपाली मोहिते, पोलीस शिपाई सचिन दरेकर व पोलीस शिपाई विलास वाघमारे यांचे विशेष पथक तात्काळ रवाना करण्यात आले. तसेच जेजुरी, सासवड, उरुळीकांचन व यवत पोलीस स्टेशन यांना नाकाबंदीबाबत सूचना देण्यात आल्या.तपासादरम्यान कुलदीप चांदगुडे यांना प्राप्त झालेल्या मोबाईल कॉलची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, पोलीस हवालदार विशाल गजरे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई विलास वाघमारे व पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी यांनी तात्काळ दिवेघाट परिसरात जाऊन संशयित वाहनाचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांच्याशी संपर्क साधून मदत मागविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जाधव व त्यांचे पथक मदतीस दाखल झाले. संयुक्त कारवाईदरम्यान झेंडेवाडी, ता. पुरंदर येथे संशयित स्विफ्ट वाहन अडविण्यात आले. वाहनामध्ये ओंकार प्रकाश भोसले (वय 27 वर्ष), तन्मय सुधीर साळुंखे (वय 20 वर्ष) व दिव्या ओंकार भोसले (वय 22 वर्ष), सर्व रा. सातव चौक, बारामती आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरण झालेला ऋषिकेश विजय चांदगुडे यास सुरक्षितरित्या शोधून काढण्यात आले.
याप्रकरणी फिर्यादी ऋषिकेश विजय चांदगुडे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 119/2026 अन्वये बीएनएस कलम 140(1), 118(1), 115, 352, 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी ओंकार प्रकाश भोसले व तन्मय सुधीर साळुंखे यांना अटक करण्यात आली असून त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता ०४ दिवसांची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त झाली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश कोळी हे करीत आहेत.
                       सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सो संदीप सिंह गिल्ल , अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार , उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली ,सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार विशाल गजरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे, पोलीस हवालदार संदीप लोंढे, चालक पोलीस शिपाई सोमनाथ होले, पोलीस शिपाई सागर वाघमोडे, पोलीस शिपाई संतोष जावीर, पोलीस शिपाई भाऊसाहेब चौधरी, महिला पोलीस हवालदार दिपाली मोहिते, पोलीस शिपाई सचिन दरेकर व पोलीस शिपाई विलास वाघमारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test