मु.सा. काकडे महाविद्यालयात १२वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

सोमेश्वरनगर. - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मु.सा काकडे महाविद्यालयात योग प्रशिक्षक सुधीर साळवे यांचे योग प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.श्री.सुधीर साळवे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले व सप्रत्यक्षिक योगाचे प्रकार करून दाखवले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दैनंदिन जीवनामध्ये योगासने व प्राणायाम हे शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाचे असून सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात दररोज प्राणायाम व योगासने करण्याचे आव्हान करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुक केले.या वेळी संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, डॉ.जया कदम, डॉ.प्रवीण ताटे देशमुख, डॉ.संजू जाधव,डॉ.अच्युत शिंदे डॉ.श्रीकांत घाडगे,डॉ आदिनाथ लोंढे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी योग दिनाचा विषय "निरोगी वृद्धत्वासाठी योग"(YOGA FOR HEALTHY AGEING) असा आहे यातून आरोग्य सुसंवाद आणि सजगता वाढीस लावणे असा या योग उपक्रमाचा उद्देश आहे. योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे-देशमुख व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे-देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ महाविद्यालय शारीरिक शिक्षण संचालक डॉ.बी.एन मरगजे यांनी केले व आभार प्रा. दत्तराज जगताप यांनी मानले.