बारामती! कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी बानप समोर जनशक्ती कंत्राटी कामगार संघ करणार उपोषण
बारामती : बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्ट्या ,पी.एफ,व इतर मागण्यांबाबत दिनांक २३/०६/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजलेपासून जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना अमरण उपोषण करणार आहे.अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.
बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्यांचे निवेदन जनशक्ती कंत्राटी कर्मचारी संघाच्या मार्फत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष सचिन सातव बारामती नगर परिषद यांना देण्यात आले.
त्यामधील प्रमुख मागण्या:
१) बा.न.प.नगराध्यक्ष श्री. सचिन सातव यांनी आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांना साप्ताहिक सुट्टी व पी.एफ. देऊ तसेच त्यांना एप्रिल व मे महिन्यातील साप्ताहिक सुट्टयांच्या वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे त्यानुसार तात्काळ त्यांनी दिलेले आश्वासनाची पुर्तता करुन एप्रिल, मे महिन्यातील साप्ताहिक सुट्टयांचे वेतन, पी.एफ. व साप्ताहिक सुट्ट्या देण्यात यावे.
२)बारामती नगर परिषदेच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत करण्यात यावा याबाबत ठेकेदारांना आदेश दयावेत.
३)कंत्राटी कामगारांना काम करताना आवश्यक सुरक्षा साहित्य (हॅण्डग्लोज, मास्क, बुट, रेनकोट व इ.) देण्यात यावे.
४)कामगारांना बोनस देण्यात यावा.
५)कामगारांना ओळखपत्र देण्यात यावे.
६)कामगारांना ईएसआयसी (ESIC) कार्ड देण्यात यावे.
७)बा.न.प.च्या सर्व विभागांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित दुरुस्ती करण्यात यावी.
८)कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.
सदर मागण्यांवर तात्काळ कारवाई करावी.कामगारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढा देणार आहे.
सदर बैठकीला बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,संघटक बाप्पा तोरणे,सह संघटक ओम शिंदे, सरचिटणीस सुरज वाडेकर,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर,महिला संघटक अलका बगाडे , महिला सरचिटणीस अनिता पवार,महिला सह कार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे पदाधिकारी, सदस्य विजय म्हस्के संतोष भट,स्वप्निल लोंढे ,राहुल सोनवणे,विकास माने,शंकर शिंदे,प्रशांत शेलार ,नवनाथ धोत्रे,व कंत्राटी कामगार उपस्थित होते.



