सोमेश्वरनगर, बारामती तालुक्यातील मुरूम येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल भागशाळा मुरूम येथे इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशद्वारापासून मुख्य इमारतीपर्यंत येऊन विद्यार्थी व पालक यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुरूम गावचे लोकनियुक्त सरपंच नंदकुमार शिंगटे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बंटीराजे जगताप नुसरत भाभी इनामदार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी भाग शाळेचे मुख्याध्यापक मानसिंग जाधव पर्यवेक्षक हनुमंत खरात, स्नेहल सोरटे, शितल सस्ते, मोहिनी शितोळे स्नेहल निंबाळकर, हरिश्चंद्र जगताप संतोष चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती टेंगले यांनी केले व आभार विनोद भोईटे यांनी मानले.



