माळेगाव पोलीस स्टेशनची पुन्हा एकदा दमदार कामगिरी दोन गावठी पिस्टल सह एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन काडतुसाच्या खाली पुंगळ्या जप्त एकास अटक
बारामती प्रतिनिधी :-
माळेगाव पोलीस स्टेशनची पुन्हा एकदा दमदार कामगिरी दोन गावठी पिस्टल सह एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन काडतुसाच्या खाली पुंगळ्या जप्त करत एकास अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस महानिरिक्षक कोल्हापुर परिक्षेत्र,रंजनकुमार शर्मा सोो. यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना पोलीस स्टेशन हद्दीमधील मालमत्तेविरूध्द व मानवी शरिराविरूध्द गुन्हे असलेले रेकार्डवरील गुन्हगार यांची सदयस्थितीची माहिती घेवुन त्यांना गुन्हे करण्यापासुन प्रतिबंध करणेकामी योग्य त्या सुचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक सोो. पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, बारामती व उपविभागीय पोलीस अधिकारी सोो. बारामती उपविभाग, बारामती यांनी देखील त्याबाबत आदेशित केलेले होते.
दि.१३/०६/२०२६ रोजी माळेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी. कुलदीप संकपाळ सहा. पोलीस निरीक्षक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे सांगवी ता. बारामती जि. पुणे येथे इसम नामे अक्षय कल्याण तावरे वय ३५ वर्षे रा. वाघवस्ती, सांगवी ता. बारामती जि.पुणे हा सांगवी गावामध्ये त्याचे जवळ गावठी पिस्टल व त्या सोबत जिवंत काडतुस घेवून कसल्यातरी उद्देशाने गावामध्ये फिरत आहे. अशी खात्रिशीर बातमी मिळाली. सदर बातमीबाबत मा. सहा. पोलीस निरीक्षक, श्री. कुलदीप संकपाळ यांनी माळेगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकास सदर ठिकाणी जावुन कार्यवाही करणेबाबत आदेशित केले असता गुन्हे शोध पथकाची टीम सदर ठिकाणी रवाना होवून इसम नामे अक्षय कल्याण तावरे वय ३५ वर्षे रा. वाघवस्ती, सांगवी ता. बारामती जि. पुणे याचा सांगवी गावामध्ये शोध घेत असताना तो सांगवी गावामध्ये कार्तीक हॉटेलसमोर खुर्चीवर बसलेला दिसला त्यास पोलीस स्टाफ आपल्याकडे येत आहे अशी चाहूल लागताच तो तेथून पळून जावू लागला त्यावेळी गुन्हे शोध पथकातील पोलीसांनी त्यास जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला दोन गावठी बनावटीचे पिस्टल, खिशामध्ये दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसाच्या खाली पुंगळया मिळुन आल्या त्यांनतर पोलीसांनी अक्षय कल्याण तावरे यास ताब्यात घेवुन त्याचे वाघवस्ती सांगवी ता. बारामती जि.पुणे येथील राहते घरी जावुन पंचासमक्ष त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता घराच्या बाजुच्या गोठ्यामध्ये एक प्लास्टिकच्या ड्रममध्ये एक रायफल मिळुन आली. त्यावेळी त्यास ताब्यात घेवून सखोल तपास करता सदर गावठी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुस व रायफल हे मागील ०८ महिन्यापुर्वी राज्य मध्यप्रदेश येथे जावुन घेवुन आलेबाबत सांगुन काडतुसाच्या खाली पुंगळयाबाबत त्याच्याकडे तपास करता दोन्ही गावठी पिस्टलची चाचणी करणेकरीता त्याने शिरवली येथील निरा नदीमध्ये फायर केल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशिररित्या दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन काडतुसाच्या खाली पुंगळया असे मिळुण आलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी अक्षय कल्याण तावरे याने बेकायदेशिररित्या शस्त्र जवळ बाळगलेने त्याचे विरूध्द माळेगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १५४/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३/२५, ५/२५ सह २७ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आलेली असून त्यांची दि. १६/०६/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर असून गुन्हयाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपी अक्षय कल्याण तावरे हा रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर पुणे ग्रामीण, सातारा व सोलापुर जिल्हयात मालमत्तेविरूध्दचे व मानवी शरीराविरूध्दचे एकुण २६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामिण संदीपसिंह गिल्ल सोो., अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सोो., उपविभागीय पोलीस अधिकारी. सुदर्शन राठोड सोो. यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रभारी अधिकारी माळेगाव पोलीस ठाणे तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, डी. आर. साळवे, तुषार भोर, पोलीस हवालदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे, तसेच पोलीस अमंलदार अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, अमोल कोकरे, नंदकुमार गव्हाणे, अमोल वाघमारे, जयसिंग कचरे यांनी केलेली आहे.



