Type Here to Get Search Results !

बारामती ! भारतीय परंपरेस अनुसरत शालेय नववर्षाचा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात.

बारामती ! भारतीय परंपरेस अनुसरत शालेय नववर्षाचा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात.
बारामती प्रतिनिधी 
  नवीन शैक्षणिक वर्ष दि १५ जून २०२६, सोमवार रोजी ची सुरुवात विद्यार्थी, पालक व शिक्षक-कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात करण्यात आली.

याप्रसंगी शाळेच्या प्रवेशद्वारावर भारतीय शिक्षणपद्धतीवर आधारित विविध शैक्षणिक उपक्रम व अभ्यासक्रमांची माहिती देणारे आकर्षक पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले होते. शाळेचा परिसर राष्ट्रीय चिन्हे, भारतीय संस्कृतीची ओळख जपणारी शुभचिन्हे, फुलांच्या माळा-तोरणे व आकर्षक रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता. तसेच शाळेत घेतल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांची ओळख व माहिती करून देणाऱ्या सेल्फी पॉईंटच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला. 

शाळेतील शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांचे कुंकूमतिलक व औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. आनंददायी व मंगलमय वातावरणात सरस्वती पूजन तसेच दैनंदिन प्रार्थना व परिपाठ संपन्न झाल्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर आणि पूर्व-प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नवे संकल्प, सकारात्मक विचार व उत्कृष्ट यशासाठी प्रेरित केले.

यानंतर सर्व शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. त्यानंतर विद्यार्थी आपल्या वर्गांमध्ये जाऊन नियमित अध्यापनास प्रारंभ झाला. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शेवटच्या तासाला विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांसह मैदानावर खेळांचा आनंद घेतला.

भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आणि आनंदी वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षाची झालेली ही सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरली.
        याप्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित, शाळेचे महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी आणि शाळेचे तसेच मएसो नियामक मंडळाचे सदस्य राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test