सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत करंजे उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि १८ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय लोकनियुक्त सरपंच भाऊसो हुंबरे यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत काळभोर होते.
मावळते उपसरपंच खुर्शिदा मुलानी यांनी राजीनामा दिल्याने पुढील उपसरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारी असलेल्या सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक लागली.
महेश पाटोळे यांना ६ मते मिळाली.त्यांचे प्रतिस्पर्धी अशोक होळकर यांना ३ मते व एक सदस्य अनुपस्थित राहिल्यामूळे महेश पाटोळे ६/३ मतानी विजयी झाले.
याप्रसंगी करंजे माजी उपसरपंच जेष्ठ मार्गदर्शक बुवासाहेब हुंबरे, , निरा कृषि उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळासाहेब शिंदे,करंजे माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड,पोलीस पाटील प्रवीण शिंदे,नंदू मोकाशी,माऊली केंजळे, सतीश पवार, राकेश गायकवाड सह ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी वृंद व इतर मान्यवर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
गावचा आशीर्वाद, पाठबळ आणि विश्वास असले की अशक्य गोष्टी शक्य होता.याचेच फळ म्हणून मला उपसरपंच पदी निवड करून दिली मी पुढील काळात सर्वांना एकत्र घेत चांगलेच काम करणार असल्याचे पाटोळे यांनी सांगितले.
___नवनिर्वाचित उपसरपंच महेश पाटोळे___



