Type Here to Get Search Results !

हरवलेले मोबाईल शोध घेत मूळ मालकांच्या स्वाधीन ; माळेगाव पोलिस ठाणेची कामगिरी.

हरवलेले मोबाईल शोध घेत मूळ मालकांच्या स्वाधीन ; माळेगाव पोलिस ठाणेची कामगिरी.

बारामती प्रतिनिधी:-
नागरीकांचे 1 लाख 56 हजार रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 07 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणे संदर्भात मा.श्री. संदीप सिंह गिल्ल सो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस दलातील माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातुन नागरीकांचे हरविलेले मोबाईल अनुषंगाने माळेगाव पोलीस ठाणे कडे प्राप्त तकारी संदर्भाने तांत्रिक विश्लेषण करुन त्यांचा शोध घेणेकरीता गोपनीय शाखेचे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांची नेमणुक केलेली आहे.
त्या अनुषंगाने पो.ना.सानप यांनी माळेगाव पोलीस स्टेशन येथे प्राप्त तकारी पैकी विक्रम अरविंद चांदगुडे रा. 22 फाटा, खांडज ता. बारामती जि.पुणे यांचा 40000/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा एस 21 एफ ई मॉडेलचा मोबाईल,यशवंत विक्रम मिंड रा. शेळगाव ता. इंदापुर जि.पुणे यांचा 32998/- रुपये किंमतीचा वन प्लस कंपनीचा नॉर्ड 4 मॉडेलचा मोबाईल, श दत्तात्रय चंद्रकांत आडके रा. काळा ओढा, शिरवली ता. बारामती जि.पुणे यांचा 24999/- रुपये किंमतीचा विवो वाय 400 प्रो 5 जी मॉडेलचा मोबाईल,सनी पोपट मदने रा. सांगवी ता. बारामती जि.पुणे यांचा 21999/- रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा एफ 21 एस प्रो मॉडेलचा मोबाईल, सौ. कल्याणी अजित झोरे रा. सांगवी ता. बारामती जि.पुणे यांचा 14600/- रुपये किंमतीचा विवो कंपनीचा टी 25 जी मॉडेलचा मोबाईल,. नितीन रावसो जगताप रा. पणदरे ता. बारामती जि.पुणे यांचा 13999/- रुपये किंमतीचा विवो कंपनीचा वाय 29 मॉडेलचा मोबाईल, श्री. अनिल भानुदास हगारे रा. शिरवली ता. बारामती जि.पुणे यांचा 7990/- रुपये किंमतीचा विवो वाय 91 मोबाईल अशा एकुण 1 लाख 56 हजार 585 रुपये किंमतीचे एकुण 07 मोबाईलचा शोध कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणांहून घेणेत आलेला असुन वरील प्रमाणे नमुद शोधलेले सदरचे सर्व मोबाईल आज वार-शनिवार, दिनांक- 13/06/2026 रोजी तकार निवारण दिनाचे दिवशी वरील प्रमाणे नमुद मुळ मालकांना परत देणेत आलेले आहेत.

सदरची कामगिरी ही मा संदीप सिंह गिल्ल सो. (भा.पो.से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.गणेश बिरादार सो. अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, डॉ. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व स.पो.नि. कुलदिप संकपाळ, प्रभारी अधिकारी, माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप गोपनीय शाखा यांनी केलेली आहे.
_________________________________________
माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मोबाईल मालकांनी आनंद व्यक्त केला असुन परीसरातील नागरीकांनी माळेगाव पोलीस ठाणे कडुन करणेत आलेल्या कामगिरीचे कौतुक करुन समाधान व्यक्त केलेले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test