जून महिना संपत आला तरी देखील अजूनही महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाहीये. राज्यात 15 दिवसांपूर्वीच मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर अचानक मान्सूनच्या वाटचालीला ब्रेक लागला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्येच पाऊस झाला, तर अजूनही महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे कोरडेच आहेत. पाऊसच झालेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या वाटेकडे लागले आहेत, मात्र आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
ती म्हणजे भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
20 तारखेपासून राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा देखील नवा अंदाज समोर आला आहे.



