Type Here to Get Search Results !

शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा रविवारी शुभारंभ....उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह खासदार पद्मभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल यांची विशेष उपस्थिती

शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा रविवारी शुभारंभ
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह खासदार पद्मभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल यांची विशेष उपस्थिती

बारामती - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील ग. दि. मा. सभागृह येथे रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी 3 वाजता शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे. 

या कार्यक्रमास राज्यसभेच्या खासदार व ज्येष्ठ समाजसेविका पद्मभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात 'टू व्हील्स ऑफ होप-सायकल बँक' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरूवात केली जाणार असून, महाराष्ट्रातील एकलाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत सायकली पोहोचविण्याच्या मोहिमेच्या प्रारंभातून प्रतीकात्मक पद्धतीने २ हजार विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. 

शैक्षणिक क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या २४० हून अधिक शाळांमध्ये डिजिटल वर्गखोली, ८० पेक्षा जास्त शाळांमध्ये स्टेम STEM प्रयोगशाळा आणि १० शाळांमध्ये पीय लॅब (Pi Lab) सुरू करण्यात येणार आहे. तसेच दोन शाळांना वॉश (WASH) (पाणी, स्वच्छता व शौचालय) सुविधा हस्तांतरीत करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयुका (IUCAA) यांच्या सहकार्याने नासा (NASA), इस्त्रो (ISRO) आणि ईएसए ESA या संस्थांच्या शैक्षणिक भेटींसाठी सामंजस्य करारावर मार्गदर्शन व सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसेच ज्ञानप्रबोधिनी, देश अपनाये सहयोग फाऊंडेशन, सेल्को (SELCO) आणि टीआयएसएस (TISS) यांसह विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी सामंजस्य करार केले जातील.

जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली हस्तलिखित पुस्तकांचे अनावरण करण्यात येणार आहे. भारत केअर्सकडून विद्यार्थ्यांसाठी पायलट शिष्यवृत्ती उपक्रमाची घोषणा करण्यात येणार आहे.

महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणासाठी 'आदिशक्ती' अंतर्गत 'गर्भाशयमुख कर्करोगमुक्त पुणे' जनजागृती मोहिमेची सुरूवात, महिला रुग्णालयासाठी बायोमेडीकल वेस्ट इन्साईनरेटर (Biomedical Waste Incinerator) यंत्राचे हस्तांतरण, MAATR ॲपच्या विस्तारित आवृत्तीचे लोकार्पण व 'आशा गाथा' महिला सक्षमीकरण गीताचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

यावेळी आदिशक्ती समन्वयकांना टॅब्लेट्स, स्वयंसेविकांना ई-बाईक्स व आशा व अंगणवाडी सेविकांना विविध साहित्य वितरण करण्यात येणार आहे. मासिक पाळी स्वच्छता व मानसिक आरोग्य या प्रशिक्षणांचा अभ्यास पूर्ण केलेल्या सेविकांना प्रमाणपत्रे प्रदान केली जातील.

याशिवाय बाल संगोपन योजना, एकल महिला घरकुल योजना, अनाथ प्रमाणपत्रे आणि एकल महिला बचत गटांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण तसेच उप प्रादेशिक परिहवन कार्यालय बारामती येथे विद्यार्थी व युवकांसाठी 'क्रूझिंग सेफ' रस्ता सुरक्षा अनुभव केंद्राचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ग्रामीण भागातील शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य व तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दृष्टी देणारा ठरणार आहे. 

श्री. गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
"पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी, अत्याधुनिक डिजिटल सुविधांचा व विज्ञानाधारित शिक्षणाचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल शाळा, स्टेम (STEM) प्रयोगशाळा, सायकल बँक, आरोग्य मोहिमा व विविध कल्याणकारी उपक्रम ग्रामीण समाजात सकारात्मक बदल घडवतील. या कार्यक्रमात खासकरून खासदार सुधा मूर्ती यांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल."

श्री. वीरधवल जगदाळे, अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद:
"ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रत्येक महिलेपर्यंत आरोग्य व सक्षमीकरणाच्या सुविधा पोहोचविणे हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक ध्येय आहे. लोकसहभाग व विविध संस्थांच्या सहकार्याने पुणे जिल्हा परिषदेचा विकास नवा आदर्श स्थापेल, असा आमचा विश्वास आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test