सोमेश्वरनगर परिसरात रिमझिम पाऊस तर दमदार पावसाची अपेक्षा.
सोमेश्वरनगर : बारामतीच्या पश्चिम भागातील सोमेश्वर पंचक्रोशी परिसरात गेले चार पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे एक दोन दिवसात तर सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या जोरदार आणि समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र, झालेल्या या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत झाली असून, पुढील पावसाच्या आशेने शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने आकाशाकडे डोळे लावून आहेत. सोमेश्वर साखर कारखाना परिसर तसेच वाकी , चोपडज, मगरवाडी, होळ , सोरटेवाडी,करंजे करंजेपूल,मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, निंबुत परिसरातही रिमझिम पावसामुळे जनावरे शेळ्या-मेंढ्यांच्या यांच्या चाऱ्याचा प्रश्न काही दिवसांसाठी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
दमदार पाऊस पडला तर शेतातील मुख्य पीक घेण्यास मदत व दिलासा मिळेल असे मत शेतकऱ्यांनी बोलताना व्यक्त केले.



