...या गावातील रस्ते सतत खड्डेमय शालेय विद्यार्थी नागरिकांना सततचा त्रास. ...एस टी महामंडळानेही बंद केली बस नागरिकांची गैरसोय...जबाबदार कोण ?
एस टी महामंडळानेही बंद केली बस नागरिकांची गैरसोय...जबाबदार कोण ?
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुर्टी , जोगवडी, कोळविहिरे (सर्वत्र मिळून १० की मी टप्पा) हा रस्ता पावसाच्या अगोदरच खड्डेमय झाला होता आता सुरू असलेल्या सततच्या पावसात जास्तीचे खड्डे पडणार असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. संबंधित प्रशासन यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचे स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले . जीव मुठीत धरत धोकेदायक रस्त्याने प्रवास करावा लागत आहे कुठला खड्डा चुकवायचा आणि कसे जायचे हाच प्रश्न प्रवासी नागरिक शालेय विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यामध्ये सततच्या पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचल्याने अनेक विद्यार्थी दुचाकी या खड्ड्यात पडले आहे.
महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता फलटण तसेच बारामती तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय जवळचा रस्ता आहे जेजुरीला एमआयडीसी कुलदैवत खंडोबा तसेच पुढे पुण्याला जाण्यासाठी बारामती नजीकचा आहे याच रस्त्याने दिवसभरात तीन एस टी बस या मार्गाने जात होत्या परंतु आता त्याही बंद झाल्या असल्याचे स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले . एसटी बस बंद झाल्याने सर्वच गावातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थी गैरसोय होत आहे. पूर्ववत एसटी महामंडळाने एसटी चालू करावी असेही स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले.



