सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६- २०२७ मध्ये इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मंगळावर दिनांक ०७ रोजी पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव श्री सतीशराव लकडे, उपप्राचार्य प्रा.राहुल गोलांदे , पर्यवेक्षक प्रा.जालिंदर खोमणे यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी पालक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून स्वागत केले.
यावेळी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयांमध्ये उपलब्ध शैक्षणिक सुविधा याविषयी मार्गदर्शन केले, त्यामध्ये महाविद्यालयाचे ग्रंथालय हे प्रशस्त असून त्यामध्ये जवळपास ४५ हजार पुस्तके उपलब्ध आहेत व दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके ऑनलाइन उपलब्ध आहेत याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, तसेच खेळाचे मैदान प्रशस्त आहे त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी करावा व आनंद घ्यावा. विद्यार्थ्यांना एखादा घटक समजला नाही तर तो घटक शिक्षकांकडे जाऊन पुन्हा समजून घ्यावा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल व शंका असेल तर थेट प्राचार्यांशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन प्रा. दत्तराज जगताप यांनी केले.



