नीरा नगरीत"रुक्माई प्रतिष्ठान" वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास दरवर्षीप्रमाणे अल्पोहार वाटप
नीरा प्रतिनिधी -पुरंदर तालुक्यातील नीरा नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन होताच ज्ञानोबा.. तुकाराम ...माऊली जयघोष व टाळ मृदंगाच्या गरज दुमदुमला असल्याने संपूर्ण निरानगरी माऊलीमय झाली.
"रुक्माई प्रतिष्ठान" च्या वतीने दर वर्षी अल्पोहार वाटप करण्यात येते याही वर्षी आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे स्वागत करत अल्पोहार वाटप करण्यात आले.
यावेळी रुक्माई प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते खजिनदार उदयकुमार जवाहर निगडे सचिव किरण मांढरे उपाध्यक्ष कमलेश लडकत ,सदस्य राजेंद्र शेळके व चंद्रकांत गाढवे सह इतर मान्यवर उपस्थित होते.



