करंजे ग्रामपंचायत वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित प्रतिमेस पुष्पहार अर्पण व वृक्षारोपण करत विनम्र अभिवादन केले.
सोमेश्वरनगर : राज्य शासनाने स्व. अजित अनंतराव पवार यांची शासकीय जयंती करंजे ग्रामपंचायत वतीने २२ जुलै रोजी प्रतिमेस पुष्पहार व वृक्षारोपण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा तसेच सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी केलेल्या अथक कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच भाऊसो हुंबरे, ग्रामपंचायत सदस्य भगवान दगडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, प्रकाश मोकाशी ,माऊली केंजळे,भगवान भगत, संजय हुंबरे , अप्पा कुंभार सह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त करंजेगाव येथे वृक्षारोपण...
महाराष्ट्र राज्याचे लोकनेते बहुजन उद्धारक स्वर्गवासी अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त करंजेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आली यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. पुरुषोत्तम जगताप जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई कदम (ढोले )पाटील पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम (ढोले) पाटील करंजे माजी सरपंच वैभव गायकवाड ,महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा सुचिता साळवे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्या अनिता भांडवलकर , ग्रामपंचायत सदस्य विष्णू दगडे प्रकाश मोकाशी माऊली केंजळे सह ग्रामस्थ उपस्थित होते.



