Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे स्व.अजिदादा पवार जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करत सोनचाफा (अजित वृक्ष ) वृक्षारोपण.

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे स्व.अजिदादा पवार जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करत सोनचाफा (अजित वृक्ष ) वृक्षारोपण.
सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. 
अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दि २२ जुलै रोजी बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर सोमेश्वर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ठीक ८.०० वाजता जिल्हा परिषद सदस्या सौ. रोहिणीताई ढोले-कदम व पुणे जिल्हा आयुक्त संदीप ढोले यांच्या शुभहस्ते श्री सोमेश्वर चरणी महारुद्राभिषेक करण्यात आला श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन  पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
दादांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि त्यांच्या कार्याचा सुगंध समाजात कायम दरवळत राहावा या भावनेतून सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सोनचाफा (अजित वृक्ष) याचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन शहाजीकाका काकडे, मा. संचालक रूपचंद शेंडकर, रमाकांत गायकवाड, उद्योजक संतोष कोंढाळकर, करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, करंजेपूल माजी सरपंच वैभव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या सुचित्रा साळवे, अनिता भांडवलकर, श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन अनंत मोकाशी, सचिव सचिन भांडवलकर, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रताप गायकवाड, प्रकाश मोकाशी, सुनील केंजळे, मोहन भांडवलकर, विष्णुपंत दगडे, राजेंद्र भांडवलकर ,रामदास भांडवलकर, तेजस कदम शेखर बाबर ,किरण पवार ,श्याम भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मोहनकाका भांडवलकर यांनी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या हृदयस्पर्शी ओव्या सादर केल्या ओव्यांमधून दादांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त होताच उपस्थित अनेक मान्यवरांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. काही क्षण संपूर्ण परिसर भावनांनी भारावून गेला.
"व्यक्ती जाते, पण तिचे विचार, संस्कार आणि समाजासाठी केलेले कार्य कायम जिवंत राहते," या भावनेने उपस्थितांनी दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुखदेवराव शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यकर्ते, ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test