Type Here to Get Search Results !

दिल्ली येथील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर मारहाणीचा निषेधार्थ सोमेश्वरमध्ये निषेध .

दिल्ली येथील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर मारहाणीचा निषेधार्थ सोमेश्वरमध्ये निषेध .
सोमेश्वरनगर  : दिल्ली येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानूष लाठीचार्ज मारहाणीचा निषेध सोमेश्वरनगर येथे गुरुवारी पालक, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेधार्थ आंदोलन केले. बारामती तालुक्यातील करंजेपूल मुख्य ते सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढत आंदोलकांनी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
'नीट' पेपरफुटीची सखोल द्यावा, चौकशी करा, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.'इन्कलाब जिंदाबाद '..'वंदे मातरम्', 'भारत माता की जय' अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या.
शेकडो विद्यार्थी, युवक आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी केली. आंदोलनानंतर वडगा निंबाळकर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
यावेळी वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, करंजे सरपंच भाऊसाहेब हंबरे, वाघळवाडी सरपंच हेमंत गायकवाड, ॲड अजिंक्य सावंत,डॉ. सौरभ काकडे, प्रदीप शेंडकर, निखिल शेंडकर,बंटी गायकवाड, दत्तात्रय शेंडकर ,दिग्विजय मगर, शिवाजी शेंडकर, सुरेश शेंडकर, सुखदेव शिंदे,गणेश शेंडकर,प्रदीप कणसे, शाहजी कोंढाळकर,केतन भोसले, गणेश सावंत, राजू बडदे,योगेश यादव, यांच्यासह विद्यार्थी, युवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test