Type Here to Get Search Results !

बारामतीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान.... MHT-CET २०२६ (PCM गट) परीक्षेत राज्यातील अवघ्या १२ विद्यार्थ्यांमध्ये २ विद्यार्थी मोशन अकॅडमी बारामतीचे

बारामतीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान.
 MHT-CET २०२६ (PCM गट) परीक्षेत राज्यातील अवघ्या १२ विद्यार्थ्यांमध्ये २ विद्यार्थी मोशन अकॅडमी बारामतीचे 

सोमेश्वरनगर - बारामतीतील २ विद्यार्थ्यांचे CET परीक्षेत शत प्रतिशत यश)बारामती, दि. २३ जुलै २०२६ MHT-CET २०२६ (PCM गट) परीक्षेत राज्यातील अवघ्या १२ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवत १०० पर्सेंटाईलचा दुर्मीळ बहुमान पटकावणारे मोशन अकॅडमी बारामतीचे विद्यार्थी आदित्य अनिल तोरवे आणि सुजल संतोष जाधव यांचा आज उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी बुधवार दि.२३ रोजी विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मोशन अकॅडमी बारामतीचे संचालक नीरज कुमार आणि पांडुरंग फुंदे व मोशन सोमेश्वर शाखेच्या प्रमुख अंजली थोरात यांची प्रमुख उपस्थितीत होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत, "बारामतीच्या दोन गुणी विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यादीत झळकून संपूर्ण शहराची मान उंचावली आहे. हे यश अजितदादांच्या बारामतीसाठी अभिमानास्पद आहे," अशा शब्दांत कौतुक केले.

संस्थेचे संचालक नीरजकुमार व पांडुरंग फुंदे यांनी सांगितले की, "आदित्य आणि सुजल यांचे हे यश मोशन अकॅडमी च्या शिस्तबद्ध अध्यापन पद्धती, नियमित सराव परीक्षा आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फलित आहे. राज्यातील १२ पैकी २ विद्यार्थी आमच्या संस्थेचे असणे ही आमच्यासाठी आणि संपूर्ण बारामतीसाठी गौरवाची बाब आहे."

कोटास्थित मोशन एज्युकेशनशी संलग्न असलेल्या मोशन अकॅडमी बारामतीने यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना JEE, NEET व MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून दिले असून, या ताज्या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test