जनशक्ती कंत्राटी कामगार संघ बारामती एमआयडीसी विभाग पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न
बारामती : जनशक्ती कंत्राटी कामगार संघ कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करीत असते.कंपनी मधील कंत्राटी कामगारांवर देखील अन्याय होत आहे.सदर लोकांसाठी लढा देण्याची भूमिका जनशक्ती कंत्राटी कामगार संघाने घेतली आहे.भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना संघटना करण्याचा अधिकार दिला आहे.आपल्या हक्कासाठी लढवण्याचा अधिकार दिला आहे.त्यामुळे कामगारांची एकजूट करून लढा देणार असल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले.
बारामती एमआयडीसी विभागाच्या कामगारांचा पदनियुक्ती कार्यक्रम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती याठिकाणी संपन्न झाला. पदाधिकारी यांना जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.एमआयडीसी विभागाच्या अध्यक्ष पदी शहाजी बाळू कांबळे,उपाध्यक्ष भारती साबळे,उपाध्यक्ष स्वाती गायकवाड,कार्याध्यक्ष सरिता सरतापे, सहकार्याध्यक्ष सुप्रिया खरात,संघटक रेश्मा सावंत,सरचिटणीस निलेश काकडे, संपर्कप्रमुख ऋतिक मिसाळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर,महिला संघटक अलका बगाडे , महिला सरचिटणीस अनिता पवार,महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे,सदस्य स्वप्निल लोंढे ,राहुल सोनवणे,शंकर शिंदे,प्रशांत शेलार ,संकेत शिंदे, प्रतिक चव्हाण,नाना बगाडे व कंत्राटी कामगार उपस्थित होते.



