Type Here to Get Search Results !

आजी माजी सैनिक संघटना वतीने "कारगिल विजय दिवस" साजरा.

आजी माजी सैनिक संघटना वतीने "कारगिल विजय दिवस" साजरा.
सोमेश्वरनगर - १९९९ साली झालेल्या युद्धात प्राण अर्पण करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान असतो. या दिवसाचे उद्दिष्ट तरुणांमध्ये देशभक्ती, अभिमान, आणि कृतज्ञेची भावना निर्माण करणे आणि राष्ट्रीय एकता आणि त्यागाची भावना बळकट करणे म्हणून देशभर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.
    २६ जुलै रोजी आजी माजी सैनिक संघटना बारामती तालुका मुख्य शाखा सोमेश्वरनगर ऑफिस कार्यालय येथे दर वर्षी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येत असतो या अनुषंगाने रविवारी दि २६ रोजी कारगील विजयोत्सव सैनिक संघटना कार्यालयात साजरा करणेत आला... कारगील मधील शहीदांना श्रद्धांजली वाहून ...भारत माता की जय.. पाकिस्तान मुर्दाबाद.. च्या घोषणा देण्यात आल्या.
  यावेळी अध्यक्ष ताराचंद शेंडकर, ॲड गणेश आळंदीकर ,उपाध्यक्ष भगवान माळशिकारे,कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जेष्ठ राजाभाऊ थोपटे,मीनानाथ होळकर,विक्रम लकडे व गणेश शेंडकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test