Type Here to Get Search Results !

सोमेश्वर वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची बिनविरोध निवड..

सोमेश्वर वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांची बिनविरोध निवड..
सोमेश्वरनगर (विनोद गोलांडे)
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर वाचनालयाची १४ वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली,सोमेश्वर वाचनालय हे गेली,४७ वर्ष अविरतपणे मोफत व अल्प दरात वाचकांना,सभासदांना, अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना वाचन साहित्याची सुविधा देत आहे. तरी त्याचा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान वाचनालयतर्फे करण्यात येत आहे.
बुधवार दि २९ रोजी वाचनालयाची सन-२०२६-२७ .मधील पहिली मासिक बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचे गुलाब पुष्प व ग्रंथ भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे सदर बैठकीमध्ये कार्यकारी मंडळाची पदनिहाय निवड करण्यात आली त्यामध्ये वाचनालयाच्या अध्यक्षपदी मु.सा.काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
 तसेच कार्याध्यक्षपदी प्रा. किरण मोरे , कोषाध्यक्ष योगेश महाले सर, कार्यवाह विनायक आगम , उपकार्यवाह राजू मदने , अंतर्गत हिशोब तपासणीस प्रा.डॉ.नारायण राजुरवार, दुसरे अंतर्गत हिशोब तपासणीस  अभिजीत सणस, स्वीकृत तज्ञ सदस्य राजेंद्र यादव साहेब कार्यकारी संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रमोद जगताप सर यांचीही स्वीकृत तज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली, मा.प्रा राहुल गोलांडे सर स्वीकृत तज्ञ सदस्य, शुभांगी खैरे स्वीकृत तज्ञ सदस्य इत्यादी पदनिहाय मासिक बैठकीमध्ये सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
 व पदनिहाय कार्यभार सोपवण्यात आला. मासिक बैठकीचे आयोजन ग्रंथपाल अजित जगताप सर यांनी केले होते. सदर बैठक चहापान घेऊन संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test