Type Here to Get Search Results !

करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रस्तावरील पडलेले धोकादायक खड्डे...अंदाज न आल्याने होत आहेत अपघात.

करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर रस्तावरील पडलेले धोकादायक खड्डे...अंदाज न आल्याने होत आहेत अपघात.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे हे देवस्थान आहे , विविध जिल्ह्यातील भाविक भक्त स्वयंभू शिवलिंग दर्शन घेण्यासाठी येत असतात.दोन आठवड्यांनी श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे . निरा - बारामती रस्त्यालगत करंजेपुल ते सोमेश्वर मंदिर अवघे चार किलोमीटर अंतर आहे तसेच पुढील एक महिना सोमेश्वर शिवभक्तांची मोठी गर्दी राहणार आहे.याच रस्त्यावर करंजेपुल नजिक सततच्या पावसामुळे जीवघेणे मोठे खड्डे पडलेले आहेत. अंदाज न आल्याने किंवा तो चुकवण्याच्या नादात जीवघेण्या खड्ड्या मुळे दुचाकी पुरुष महिला तसेच शालेय विद्यार्थी खड्ड्याचा अंदाज न आल्याने पडले आहे व दुखापतही झाली असल्याचे स्थानिक व्यावसायिक यांनी सांगितले तसेच. सोमेश्वरनगर हे शिक्षण संकुल हॉस्पीटल , विविध उपयोगी व्यवसाय असल्याने मुख्य बाजारपेठ असल्याने चौधरवाडी, भापकरमळा, माळवाडी,देऊळवाडी, जोशीवाडी, रासकरमळा, मगरवाडी वाकी चोपडज येथीलशेतकरी नागरिक व विध्यार्थ्यांना याच मार्गाचा वापर करावा लागतो आहे. पुढील अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने यावर त्वरित लक्ष देत ते लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी प्रवाशांसह ग्रामस्थ विद्यार्थी पालक-नागरिक व पंचक्रोशीतील सोमेश्वर भाविकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test