Type Here to Get Search Results !

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम.


वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
  
यामध्ये रंगीत (ब्लॅक फिल्म) काचा असणे,फॅन्सी/कलर नंबर प्लेट अथवा नंबर प्लेटनसलेली वाहणे,दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास,वैध वाहन चालविण्याचा परवाना नसणे,विना हेल्मेट दुचाकी चालविणे मालवाहू वाहनांवर आवश्यक रेड रिफ्लेक्टर नसणे,बुलेट मोटारसायकलमध्ये मॉडिफाईड (फटाका) सायलेन्सर बसविणे,इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन
अशा एकूण ८४ वाहनांवर कारवाई करत तब्बल ९३ हजार ५०० दंड वसूल केला आहे.

 वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वाहनावर नियमबाह्य बदल करू नयेत तसेच वैध कागदपत्रे बाळगावीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही लहान मुलांना वाहन देणे अवजड वाहने यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक. गणेश बिराजदार, बारामती विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी. चैतन्य कदम, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस हवालदार नाळे, पोलीस हवालदार खेडकर, पोलीस हवालदार देवकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल जाधव, धोत्रे, भोसले, यादव व सोनवणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test